We want your
feedback

पॉलिसी बझ

Accountability Initiative Staff

16 February 2021

कल्याणकारी धोरणात जे घडत आहे त्या प्रत्येक पंधरवड्यात प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या निवडीसह अद्ययावत रहा.

 

धोरणा संबंधित बातम्या

  • केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आम्ही, अकाउंटबिलिटी इनीशीटिव येथे, 10 बजट ब्रीफ दिलेल्या आहेत त्यामध्ये सरकारने दिलेल्या आकडेवारीचा वापर करून आवश्यक सामाजिक क्षेत्राच्या योजनांचे आयोजन, सार्वजनिक खर्च, आउटपुट आणि परिणामांचे विश्लेषण करतो.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या पहिल्या सुधारित अंदाजानुसार, 2019-20 मध्ये अर्थव्यवस्थेच्या तुलनेत 4 टक्क्यांची नीचांक नोंद झाली आहे, तर पूर्वीच्या अंदाज 4.2 होता.
  • महाराष्ट्र सरकारने आय.टी पेटंट दाखल करण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्टअप ना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने एक योजना सुरू केली.
  • पुढील वर्षी मार्चपर्यंत सर्व ग्रामीण घरांना 100 टक्के पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंजाब सरकारने ‘हर घर पाणी, हर घर सफाई’ अभियान सुरू केले आहे.
  • वित्त मंत्रालयाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी 18 राज्यांना 12,351 कोटी रुपयांचे अनुदान जारी केले आहे.

कोरोनाव्हायरस-फोकस बातम्या

  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एस.आय.आय) आणि युनिसेफ यांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका/ऑक्सफोर्ड आणि नोव्हाव्हॅक्स लसींसाठी दीर्घकालीन पुरवठा करारांवर स्वाक्षरी केली आहे.

 

हा लेख पॉलिसी बझच्या इंग्रजी आवृत्तीवर आधारित आहे जो 7 फरवरी 2021 रोजी प्रकाशित झाला.

Add new comment

Your email address will not be published. Required fields are marked *