पॉलिसी बझ
3 January 2021
कल्याणकारी धोरणात जे घडत आहे त्या प्रत्येक पंधरवड्यात प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या निवडीसह अद्ययावत रहा.
धोरणा संबंधित बातम्या
- 5 व्या राष्ट्रीय आरोग्य कौटुंबिक सर्वेक्षण (एन.एफ.एच.एस) देशातील लोकसंख्या, आरोग्य आणि पोषण विषयी विस्तृत माहिती दिली गेली आहे.
- साथीच्या आजारामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, अशी घोषणा सरकारने केली आहे.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसन) अंतर्गत 18,000 कोटी रुपयांच्या आर्थिक लाभाचा पुढील हप्ता सरकारने जाहीर केला आहे.
- झारखंड सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफी योजनेस मंजुरी दिली असून यामुळे राज्यातल 7.83 लाख शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
- जम्मू-काश्मीरमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना (ए.बी-पी.एम.जे.वाय) सेहत योजना सुरू करण्यात आली असून यात २१ लाख लोकांना फायदा होणार आहे.
इतर
- गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीने भविष्यात होणाऱ्या सर्व साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रवासी कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याची शिफारस सरकारला केली आहे.
- बोडोला राज्याची सहकारी भाषा बनवण्यासाठी आसाम सरकारने आसाम अधिकृत भाषा दुरुस्ती विधेयकास मान्यता दिली आहे.
- सुरक्षित आणि हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरीडोर तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या प्रोजेक्टसाठी भारत सरकार आणि जागतिक बँकेने करार केला.
हा लेख पॉलिसी बझच्या इंग्रजी आवृत्तीवर आधारित आहे जो 27 दिसंबर 2020 रोजी प्रकाशित झाला.